मोगऱ्याच्या बागेत चालतांना
दिसतेस तू फुलासारखी डोलताना
छोट्याश्या खारु सारखी हसताना
नाचणाऱ्या मोराासारखी चालताना
तुझ्याशी रोज रोज बोलताना
तुझा हात घेऊन चालताना
डोळ्यात तुझ्या पाहताना
दिसते तू गालातल्या गालात हसताना
तुला बघून रोज झोपताना
ऐकून तुला रोज घोरताना
दिसतो मला मी रोज रोज
तुझ्या प्रेमात पुन्हा पडताना
No comments:
Post a Comment